राज्यातील समृद्धी महामार्गाला मेधा पाटकर यांचा विरोध
मुंबई ते नागपूर दरम्यान होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला सामजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी विरोध दर्शविला आहे.
नाशिक : मुंबई ते नागपूर दरम्यान होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला सामजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी विरोध दर्शविला आहे.
महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आक्रमण आहे. मुलभूत सुविधांचा अवाढव्य पसारा वाढविला जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन भांडवलदारसाठी रस्ते बनविण्याचा घाट घटल असून त्याला विरोध कायम राहील, असा इशारा मेधा पाटकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिला.
त्याच बरोबर सरदार सरोवराचे प्रश्न सरकारने अजूनही प्रलंबित ठेवलंय गुजरात आणि केंद्र स्र्क्राच्या दबावाखाली मध्यप्रदेश आणि महराष्ट्र सरकार काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.