नाणार जमीन खरेदी प्रकरणी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्षांचे आदेश
अहवाल एक महिन्यात देण्याचे आदेश
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाणार जमीन खरेदी प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली जाणार आहे. या चौकशी समितीस आपला अहवाल एक महिन्यात देण्याचे आदेश देण्यात आलेयत. आज विधानसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
नाणार प्रकल्प घोषित होण्यापूर्वी परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात किरकोळ दरात जमीन खरेदी केली होती. या जमीन खरेदीत गुजराती, मारवाड्याच्या मोठ्या प्रमाणात समावेश होता. २०१७ ला प्रकल्प घोषित झाला मात्र त्यापूर्वीच २०१६ साली परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली होती. १५ गावातील एकूण ३ हजार एकर जमीन परप्रांतीयांनी खरेदी केली.
आज विधानसभा अध्यक्षांकडे पार पडलेल्या बैठकीला उद्योग आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.