कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : मन हेलावून टाकणारी ही बातमी... पिंपरी चिंचवडजवळ मारुंजी परिसरात एका दोन दिवसांच्या मुलीला बेवारसपणे सोडण्यात आले. वेळीच लक्षात आल्याने या चिमुरडीचे प्राण वाचले खरे पण या घटनेने असंवेदनशीलतेचे दर्शन ही घडले.


काय होता 'ती'चा गुन्हा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी कोणत्याही संवेदनशील मानसाचे मन हेलावून टाकल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवडजवळ मारुंजीच्या एका मोकळ्या मैदानात या चिमुरडीला असे उघड्यावर टाकून कोणी तरी निघून गेलं...


परिसरातल्या नागरिकांना या चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आला. वेळीच त्यांनी पोलिसांना कळवले आणि तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या चिमुकलीला पुणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तिची प्रकृती स्थिर आहे.


चिमुरडीला घर मिळणार?


आता या दोन दिवसांच्या चिमुकलीला कोणी आणि कोणत्या कारणामुळे सोडलं याचा पोलीस शोध घेत आहेत. पण कारण काही ही असो त्यात या चिमुकलीचा दोष नक्कीच नाही. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिल्यावर तिला सोडून जाणारे तिला घेण्यासाठी परत यावेत हीच काय ती अपेक्षा...