अरूण मेहत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील ओशो आश्रमच्या बाबतीत आणखी एक नवीन वाद उभा राहिला आहे. इथल्या ट्रस्टीनी आश्रमाची काही जमीन विक्रीला काढली आहे. त्यामुळे ओशोचे भक्त संतापले आहेत. जगप्रसिद्ध ओशो आश्रमची जमीन विक्रीला काढण्यात आली आहे. 3 एकर भूखंडाचा 107 कोटींना व्यवहार ठरत आहे. प्रसिद्ध उद्योजक राजू बजाज घेणार जमीन विकत घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव बजाज यांच्या बंगल्याला लागून असलेला हा भूखंड ओशो आश्रमाच्या मालकीचा आहे. कोरोना संकटामुळे आश्रम गेले 10 महिने बंद आहे. अशा परिस्थितीत आश्रमाच्या देखभालीचा खर्च व्यवस्थापनाला झेपेनासा झालाय. तेव्हा हा खर्च भागवण्यासाठी आश्रमाच्या मालकीचा हा भूखंड राजीव बजाज यांना विकण्याची परवानगी विश्र्वतांकडून धर्मादाय आयुक्तांकडे मागण्यात आलीय. मात्र ओशो च्या काही जुन्या अनुयायांनी हा भूखंड विकण्यास विरोध केलाय.


 


ओशो आश्रमाची जागा पुण्यातील प्राईम प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तिला गिऱ्हाईक मिळणे सहज सोपे आहे.  राजीव बजाज यांना ही जागा देण्याबाबत सामंजस्य करारदेखील झाला आहे. ओशो आश्रमाच्या वतीने मात्र या विषयावर कोणी अधिकृतपणे बोलायला तयार नाहीत.


भगवान रजनीश म्हणजेच ओशोंच जगभरात प्रस्थ आहे। असं असताना गेल्या काही वर्षांपासून आश्रमाचा कारभार वादात सापडलाय. याआधी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी च्या मालकीवरून वाद उभा राहिला होता. आता भूखंड विक्री प्रकरण समोर आलंय. एकुणात काय तर आश्रम असला तरी याठिकाणी सारकाही आलबेल आहे असं अजिबात म्हणता येणार नाही.