चिंताजनक!!! कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णसंख्येत देशातील टॉप १० जिल्ह्यांत ९ जिल्हे महाराष्ट्रातले
कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात सक्रीय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले ९ जिल्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात सक्रीय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले ९ जिल्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
कोरोना सक्रीय रुग्णांमध्ये देशातील टॉप १० जिल्ह्यांत महाराष्ट्रातले कोण-कोणते जिल्हे?
जिल्हा | कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण |
पुणे | ४३ हजार ५९० |
नागपूर | ३३ हजार १६० |
मुंबई | २६ हजार ५९९ |
ठाणे | २२ हजार ५१३ |
नाशिक | १५ हजार ७१० |
औरंगाबाद | १५ हजार ३८० |
नांदेड | १० हजार १०६ |
जळगाव | ६ हजार ८७ |
अकोला | ५ हजार ७०४ |
महाराष्ट्र आणि पंजाब अशी राज्य आहेत, जिथे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. देशात दररोज नव्या रुग्णांची सर्वाधिक नोंद ही महाराष्ट्र राज्यातच होत आहे. महाराष्ट्रात दररोज २५ ते २८ हजाराच्या घरात नव्याने कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे.
महाराष्ट्राबरोबरच पंजाब, मध्य प्रदेश, गुजरातमध्येही कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि बीड जिल्ह्यात लॉकडाऊनही लागू आहे, तसंच मुंबईसह अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधातले निर्बंध कडक करण्यात आले आहेत.