Pradeep Kurulkar Honey Trap Case: डीआरडीओचा (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप (Pradeep Kurulkar Honey Trap) प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर आणि जाराचं व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) समोर आलं आहे. पाकिस्तानी एजंट असलेल्या जाराने प्रदीप कुरुलकराल हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेतली होती. प्रदीप कुरुलकरनेही राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची सर्व गोपनीय माहिती जारासमोर उघड केली. एटीसएसने (ATS) दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये हे धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आता प्रदीप कुरुलकर आणि जारात नेमकं काय संभाषण झालं होतं, याचं चॅट समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे चॅटमध्ये
पाकिस्तानी एजेंट जारा - बेबी, मी आताच हे वाचलं, तुम्ही याच गोष्टीवर काम करत आहात का?
DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर - हां. मी SAMs वर काम करत आहे.
जारा - तुम्ही हे आर्मी देणार की एपअरफोर्सला?
प्रदीप - दोघांनाही
जारा - याचं टेस्टिंग आणि ट्रायल पूर्ण झालं का?
जारा - अच्छा एक गोष्ट सांगा... ब्राम्होसही तुमचा शोध आहे का बेबी?
प्रदीप - माझ्याकाडे सुरुवातीच्या डिझाईनचे रिपोर्ट्स आहेत. 
जारा- हे एअर लाँच्ड व्हर्जन होतं ना? आपण या आधीहीय यावर बोललो होतो
प्रदीप - हम्मम...


प्रदीप कुरुलकर आणि पाकिस्तानी एजंट जारामध्ये झालेलं हे संभाषण. या संभाषणाचा छोटासा भाग एटीएसमने दिला आहे. खरंतर प्रदीप कुरुलकरने अनेक गोपनीय माहिती जारा पुरवली होती. प्रदीप कुरुलकर केवळ शास्त्रज्ञच नाही तर पुणे डीआरडीओचे संचालकही होते. प्रदीप कुरुलकरचे कारनामे उघड झाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्याला अटक केली. इतकंच नाही तर त्याच्याविरोधात 1800 पानांचं चार्जशीटही बनवण्यात आलं आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. 


अशी झाली सुरुवात
हनीट्रॅपची सुरुवात झाली ती जून 2022 मध्ये. एकदिवस अचानक प्रदीप कुरुकरच्या मोबाईलवर मेसेज आला. यात लिहिलं होतं, मी लंडनमध्ये राहाते आणि तुमची मोठी प्रशंसक आहे. तुम्ही भारतासाठी जे काम करताय ते अद्भूत आहे. माझं नाव जारा दासगुप्ता असं आहे. मी लंडनला राहाते आणि तुम्हाला सोशल मीडिवर फॉलो करते. याच मेसेजमुळे 59 वर्षीय प्रदीप कुरुलकरचा त्या कथित मुलीवर जीव जडला. त्यानंतर त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरु झालं. पण हेच चॅटिंग प्रदीप कुरुलकरला तुरुंगात टाकण्यास पुरेसं ठरलं. चॅटिंगसाठी ज्या व्हॉट्सअॅप नंबरचा वापर केला जात होता, तो नंबर +44 ने सुरु होणारा होता. हा इंग्लंडचा कोड आहे. हा नंबर यासाठी निवडण्यात आला होता, ज्यातून त्या मुलीने इंग्लंडला असल्याचं भासवलं. मुलीच्या गोड-गोड बोलण्यात कुरुलकर हळूहळू फसत गेला. 


भारतीय असल्याचा बनाव
मुलीने आपण मुळची अंबालाचा असल्याचं सांगितलं. तसंच सायन्सची स्टुडंटअसून डिफेंसशी संबंधीत अभ्यास करत असल्याचं तीने कुरुलकला सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर फॉलो करत अल्याचंही तीने सांगितलं. कुरुलकरला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. हळू-हळू दोघांमध्ये खासगी गोष्टीही शेअर होऊ लागल्या. एकवेळ अशी आशी की कुरुलकर आणि जारा नावाच्या त्या मुलीमध्ये न्यूड फोटो आणि सेक्स चॅट शेअप केले जाऊ लागले. याच फोटोंच्या मदतीने जाराने प्रदीप कुरुलकरकडून अनेक टॉप सिक्रेटची माहिती करुन घेतली. 


संवेदनशील माहिती सांगितली
जारा - तुमची टेस्ट यशस्वी ठरली का?
प्रदीप - लॉन्चर ही माझी डिझाइन आहे बेब
जारा - टेस्ट सक्सेफुल झाली का?
प्रदीप - मोठं यश मिळालं
जारा - मी असं ऐकलं आहे की अग्नि-6 वरही काम सुरु आहे, त्याची टेस्ट कधी आहे?
प्रदीप - करणार आहे, सांगेन.


प्रदीप कुरुलकर अतिशय गोपनीय माहिती जाराला देत असल्याचं या संभाषणातून समोर आलं आहे. संवदेनशील ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही माहिती मित्रांनाच काय तर कुटुंबियानाही सांगता येत नाही. पण प्रदीप कुरुलकरने सर्व सीमा ओलांडल्या होत्या. प्रदीप कुरुलकर अग्नी मिसाइलबाबतची महत्त्वाची माहिती तिला देत होते. याशिवाय मेटेओर मिसाइल, राफेल, एके सिस्टम आणि एस्ट्रा मिसाईलन याबाबतही त्यांच्यात बोलणं झालं होतं. इतक्या सिनीअर पोस्टवर असलेला प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये फसला कसा याबाबतचा तपास केला जात आहे. 


धक्कादायक म्हणजे हनीट्रॅपमध्ये फसण्याच्या काही महिने आधीच प्रदीप कुरुलकरने हनीट्रॅप काय असतो? याबाबत जागरुकता कार्यक्रम केला होता. यात हनीट्रॅप म्हणजे काय? त्यात अडकू नये यासाठी टीप्सही दिल्या होत्या.