COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, असा आरोप करत काँग्रेसच्या शिष्टमंडळानं दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पालघर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांकडून साम दाम दंड भेदची भाषा करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करावी, अशी मागणी या शिष्टमंडळानं केलीय. पालघर पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पराभव करत सत्ता कायम राखली. पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना २,७२,७८० मते मिळाली. तर शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना २,४३,२०१६ मते मिळाली.