पालघर नगरपरिषद निवडणुकीत युतीला सर्वाधिक जागा पण...
पालघरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्यात
पालघर : पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक अशा १८ जागांवर विजय मिळलाय. निकालानंतर युतीला बहुमत मिळालेलं असलं, तरीसुद्धा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झालाय. नगराध्यक्षपदासाठी युतीच्या श्वेता पिंपळे उभ्या होत्या. १४ प्रभागांमध्ये नगराध्यक्षसह २७ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात होते.
विशेष म्हणजे शिवसेनेचे पाचही बंडखोर उमेदवार निडवडून आले आहेत. पालघर नगरपरिषद शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र बंडखोरीमुळे शिवसेनेला नगराध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं आहे.
लोकसभा निवडणूक : सेनेकडून भाजप नेत्याला तिकीट
पालघरचे भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना वाऱ्यावर सोडल्याची चर्चा आहे. पोटनिवडणुकीत भाजपाने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राजेंद्र गावित यांनी भाजपाकडून पोटनिवडणूक लढवली होती त्यात शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला होता. आता युतीत शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्याने शिवसेनेनं भाजपाच्या खासदारालाच तिकीट दिलंय.