सोलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक (Pandharpur assembly constituency by-election) जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणुक होत आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली. यामुळे सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. 23 मार्च रोजी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार. 30 मार्चपर्यंत  अर्ज भरता येणारर. 17 एप्रिलला मतदान तर 2 मेला मतमोजणी होणार आहे. (Pandharpur assembly constituency by-election announced, code of conduct enforced)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणुक होत असल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. ही जागा पुन्हा राष्ट्रवादी आपल्याकडे राखणार का, याची उत्सुकता आहे. भारतीय निवडणूक आयोगाने काल पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पंढरपूर प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली.


पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 39 हजार 540 मतदार आहेत. 524 मतदान केंद्र असून कोविड 19 पार्श्वभूमीवर 196 मतदान केंद्र वाढवले आहेत. दीड हजार कर्मचारी अतिरिक्त असतील. कोविड 19 पार्श्वभूमीवर 20 ऑगस्ट 2020 च्या भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल अशी  माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.