मुंबई : सून ही घरची लक्ष्मी असते आणि सासरा हे वडिलांच्या जागी असतात. आपलं कुटुंब सुखी आणि आनंदाने नांदत असताना त्याला नजर लागावी अशी घटना समोर आली आहे. वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यानेच सूनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सासऱ्याने त्याच्या स्वार्थासाठी सूनेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला आणि तिच्याकडे अजब मागणी केली. ही मागणी ऐकताच सूनेच्या पायाखालची जमीन सरकली. वडिलांसमान असलेल्या सासऱ्याने जी मागणी केली ती ऐकून सूनेला मोठा धक्का बसला आहे. 


पंढरपूर तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सासऱ्याने सुनेचे अंघोळ करताना व्हिडीओ काढून शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


विवाहित महिलेला तिच्या पतीपासून मुल होत नव्हते. त्यांनी याबाबत वैद्यकीय उपचारही घेतले होते. याची माहिती सासऱ्याला कळली. सासऱ्याने याच गोष्टीचा फायदा उचलण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलापासून सूनेला मुल होणार नाही हे समजताच तिचा अंघोळीचा व्हिडीओ काढला. 


अंघोळीचा व्हिडीओ काढल्यानंतर त्याने सूनेला हा व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हा व्हिडीओ दाखवून सूनेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. ही गोष्ट सूनेने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर सासऱ्या विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.