सचिन कसबे /  पंढरपूर : Sugar Factory Election Meeting: NCP's Rada in Bhagirath Bhalke Group Meeting : साखर कारखाना निवडणूक निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राडा पाहायला मिळाला. तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी सत्ताधारी चेअरमन भगीरथ भालके गटाने आज बैठक घेतली आहे. या बैठकीत ऊसाचे बिल मागितलेल्या शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे काही काळ या बैठकीत तणाव होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपुरातील मंगल कार्यालयात श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद यांची निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय बैठक आयोजित केली होती. यावेळी रोपळे येथील शेतकरी जगन भोसले यांनी माईकवर येत आपण अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे ऊसाचे बिल द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत मला ऊसाचे बिल मिळाले नाही, असे सांगितले. अनेक भाषणं केली पण कोणीही काही केलेल नाही, अशी व्यथा मांडली. यावेळी संतप्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी जगन भोसले याला धक्काबुक्की केली आहे.


श्री विठ्ठल कारखाना प्रमुख लोकां समोरच राडा झाल्याने काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले होते. यानंतर पुन्हा विचार विनिमय बैठक सुरु झाली. मात्र उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रचार सुरु झाल्यानंतर पुन्हा ऊस बिल प्रश्न मुद्दा प्रचारात गाजण्याची शक्यता आहे.