आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी `या` दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : तब्बल 79 दिवसांनी पुन्हा एकदा विठुरायाचं चरणस्पर्श घेता येणार आहे. रविवारी 2 जूनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांसाठी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. विठुरायाच्या मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचं काम 15 मार्च पासून सुरु होते. गेले दीड महिना अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारली आहे.
विठुरायाची मूर्ती मोठी असल्यानं त्याची उंची 9 फूट तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीची उंची कमी असल्यानं येथे 7 फूट उंचीची मेघडंबरी साकारण्यात आलाय. गेल्या दीड महिन्यात भाविकांना पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळातच मुखदर्शन घेता येतं होते. आता चौखांबी आणि सोळखांबीचं काम पूर्ण झालं असून भाविकांना आता विठुरायाचं चरणस्पर्श घेता येणार आहे. विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्यासाठी गाभारा , चौखांबी , सोळखांबी, बाजीराव पडसाळी वगैरे भागाचं काम करण्यात आलं.
मेघडंबरीलला 16 गेज जाडीच्या चांदीच्या पत्र्याचं आवरण करण्यात आलं आहे. ही चांदी पुढील वर्षानुवर्ष व्यवस्थित राहणार आहे, असा दावा मंदिर समितीने केलाय. पहिली मेघडंबरी काढताना विष्णू महाराज कबीर यांनी देवापुढे नवीन मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला होता. यासाठी साधारण 60 घनफूट एवढं सागवानी लाकडाचा वापर झाला आहे. अतिशय रेखीव असं नक्षीकाम यावर करण्यात आलंय.