CM माझे राजकीय गुरु, मी अंगठा द्यायला तयार - पंकजा मुंडे
माझे राजकीय गुरु हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत - पंकजा मुंडे
बीड : मी अनेकवेळा मुलाखती दिल्या आहेत. मात्र, त्यावेळी मी माझे गुरु म्हणून माझे वडील यांच्या नावाचा नेहमीच उल्लेख केला आहे. मात्र, आज ते आपल्यात नाही. त्यांच्यानंतर आता माझे राजकीय गुरु हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यासाठी मी माझा अंगठा द्यायला तयार आहेे, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केले आहे. बीडमध्ये महाजनादेश यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे गुरुदक्षिणा म्हणून अंगठा जरी मागितला, तरी मी अंगठा द्यायला तयार आहे. पण, तो अर्जुनासाठी असावा, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. मात्र, तो अंगठा अर्जुनासाठी असावा असेही त्या यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावेळी आष्टी येथून सभा बीडकडे येत असताना रस्त्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत उघडपणे राष्ट्रवादीचे काम करून मुख्यमंत्री यांनी मेटे यांचे स्वागत स्वीकारल्याने संतप्त झालेल्या पंकजा मुंडे गाडीत बसून बीड निघून गेल्यात.