मुंबई : Pankaja Munde News : भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत भाजप हायकमांड निर्णय घेतील, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबाबत लवकरच निर्णयाची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक (Legislative Council Election 2022) होणार आहे. या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार यांची मोठी उत्सुकता आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव पुढे आले आहे. विशेष म्हणजे पंकजा यांचे नाव याआधीदेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत होतं, मात्र ऐनळी भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली नव्हती. 


पंकजा यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळणार का? याबाबत त्यांनी मोठे विधान केले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील पंकजा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पात्र असल्याचे विधान केले. त्यामुळे विधानपरिषदेच्या 10 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून पंकजा यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?


पंकजा मुंडे यांच्याबद्दल नाराजी नाही. पंकजा आमच्या सिनियर नेत्या आहेत. ज्यावेळी एखादी निवडणूक येते त्यावेळेस त्यांचे नाव चर्चेत येणे हे साहजिक आहे. त्यामुळे त्यात काही वावगे असे काहीही नाही. कारण त्या कोणत्याही पदाकरता एलिजिबलच आहेत. त्या संदर्भातील निर्णय हायकमांडला घेण्याचा अधिकार आहे. आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.