Beed News : जनतेच्या मनात असेन तोपर्यंत पंतप्रधान मोदीही (PM Narendra Modi) आपल्याला संपवू शकणार नाहीत असं मोठं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपण बेरोजगार असल्याचं वक्तव्य केलंय.


काय म्हणाल्या Pankaja Munde -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी कुणाला काम देऊ शकते? सध्या मी बेरोजगार आहे. त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवात पंकजा बोलत होत्या.


मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी वादग्रस्त वक्त्यावरून झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.


जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे.हे युद्ध सोशल मीडियावर लढलं जातंय, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.


Rohit Pawar Birthday: 'पाहता क्षणी प्रेमात पडलो', रोहित आणि कुंती पवारांच्या लग्नाची गोष्ट


सध्याचं राजकीय युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो, असं सार्वजनिक दुर्गा महोत्सवात पंकजा मुंडे म्हणाल्या.