Pankaja Munde: पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी वैदनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीस काढला असून या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून थकित कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. पंकज मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनियन बँकेने यापूर्वी सुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार असल्याची नोटीस दिली होती. 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यावरील थकीत कर्जापोटी युनियन बँकेने आता लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. 


कारखान्याकडे तब्बल 203 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून कर्जवसुलीसाठी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. युनियन बँकेकडून लिलावाच्या संदर्भात यापूर्वीसुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार असल्याची नोटीस काढण्यात आली होती. यासाठीची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी पार पडणार असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीसमध्ये वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे आहेत. दरम्यान यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने देखील दंड ठोठावला होता. यानंतर आता ही कारवाई झाल्याने कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यावर 19 कोटी थकित असल्याची नोटीस बजावली होती. तेव्हा कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी लोकचळवळीतून 19 कोटींची थकबाकी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र. त्यास पंकजा मुंडे यांनी नकार दिला होता. तसंच, केंद्रावरही नाराजी व्यक्त केली होती. 9 कारखान्यांना केंद्राकडून मदत मिळाली मात्र, आपल्या कारखान्याला यादीतून वगळल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. 


आता वैद्यनाथ कारखान्याकडे कर्ज थकित असल्याचे समोर आले आहे. युनिअन बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून ही प्रकिया हाती घेण्यात आली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणारर असल्याची माहिती समोर येतेय. पंकजा मुंडे यांना मात्र, याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. पंकजाताईंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.