मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंचा निश्चय
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. विनायक मेटेंच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आता भाजप नेते मैदानात उतरलेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी घोषणा पंकजा मुंडेंनी आज बीडमध्ये जाहीर सभेत केली. तर मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. विनायक मेटेंच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळल्यानं आता मराठा आरक्षणाचा मार्ग खुंटल्याचं मानलं जातंय. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासंदर्भात लवकरच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. दुसरीकडे भाजपचे दिग्गज नेते देखील मराठा आरक्षण मिळवून देण्यावर ठाम आहेत.