मला राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा डाव- पंकजा मुंडे
वैद्यनाथ कारखान्याबाबत कोणाच्याही तक्रारी नसताना, केवळ राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा डाव काही लोक रचतायत, म्हणूनच कारखान्याचा परवाना १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आलाय, अशी खंत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी औरंगाबादमध्ये व्यक्त केली. औरंगाबादमध्ये महिला बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
औरंगाबाद : वैद्यनाथ कारखान्याबाबत कोणाच्याही तक्रारी नसताना, केवळ राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा डाव काही लोक रचतायत, म्हणूनच कारखान्याचा परवाना १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आलाय, अशी खंत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी औरंगाबादमध्ये व्यक्त केली. औरंगाबादमध्ये महिला बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
तक्रारी नाहीत
गोपीनाथ मुंडे होते, तेव्हा या कारखान्याबद्दल तक्रारी नव्हत्या. आताही या कारखान्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत.
अपघातात ज्यांच्या घरचे लोक दगावलेत, त्यांच्याही तक्रारी नाहीत. हजारो शेतकऱ्यांच भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.