Panvel Mahanagarpalika Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पनवेल महानगरपालिकेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल महानगरपालिकेतवैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून एमबीबीएस असणे आवश्यक आहे. 70 वर्षांवरील उमेदवार यासाठी अर्ज करु शकत नाहीत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांवर ही भरती केली जात आहे.


अर्ज करणाऱ्या उमेदवाराची महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी पदाचा अनुभव असलेल्या उमेदवाराला पनवेल महापालिका नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्या. एससीची 2 तर एसटी, एनटीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि खुल्या वर्गातील प्रत्येकी 1 अशा पद्धतीने रिक्त पदे भरली जाणार आहेत


थेट मुलाखत 


वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराची लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 


पगार


वैद्यकीय अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


मुलाखतीचा पत्ता


4 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची मुलाखत होणार आहे. यासाठी त्यांना पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – 410206 या पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. यानंतरच्या प्रत्येक बुधवारी रिक्त पद भरेपर्यंत ही मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना 11 ते 4 या वेळेत उपस्थित राहता येणार आहे.


उमेदवारांनी नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र सोबत आणावीत. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आल्यास नोकरी दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. 


पनवेल पालिकेची अधिकृत वेबसाईट panvelcorporation.com वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा