आई-बाप आणि लेक, एकाच वेळी तिघे रेल्वे ट्रॅकवर; शिक्षकाच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय
Parabhani Sucide: परभणीच्या गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Parabhani Sucide: शिक्षक मुलांना चांगली शिकवण देतात. आनंदाने आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात. पण एका शिक्षकाने आपल्या कुटुंबासह टोकाचं पाऊल उचललंय. एकाचवेळी तिघांची रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या आत्महत्या केली आहे. कुठे घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
परभणीच्या गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोदावरी नदी पुलाच्या रेल्वे ट्रॅकवर एका शिक्षकाच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याची आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मसनाजी सुभाष चुडमे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत होते. मसनाजी यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसह स्वतःला रेल्वे ट्रॅकखाली झोकून देले आणि कुटुंबाची जीवनयात्रा संपविली.
शिक्षक मसनाजी चुडमे, पत्नी रंजना मसनाजी चुडमे आणि मुलगी अंजली यांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळले. परळीकडे कोळसा घेऊन जात असलेल्या रेल्वेखाली स्वतःला झोकवून देत आत्महत्या केलीय. गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या धारखेड शिवारातील ही घटना घडली आहे.
सदर शिक्षक कुटुंब हे अहमदपूर तालुक्यातील कीन्ही गावातील असल्याची माहिती आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या कुटुंबाने आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकली नाहीये. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकीची ट्रॅक्टरला जबर धडक, तिघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या बोथली- हिरापूर रोड वरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात 3 युवक ठार झाले. शेतकरी शेतातून काम करून ट्रॅक्टर रोडच्या कडेला लावून लाईट सुरू ठेवून एका सहकाऱ्याची वाट बघत होता. अचानक केटीएम कंपनीच्या दुचाकीवर तिघे जण भरधाव वेगाने जात असतानाच दुचाकी स्वाराचे संतुलन सुटले आणि त्याने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हर्षद दंडावार याचा जागीच मृत्यू झाला. तर साहील कोसमशीले व बाईकवर असलेला तळोदी येथील त्यांचा मित्र साहिल गणेशकर गंभीर जखमी झाले. त्या दोघांना गडचिरोलीच्या रुग्णालयात नेताना साहिल चा वाटेतच मृत्यू झाला.तर कोसनशिले या युवकाचा उपचारांअंती मृत्यू झाला. तीनही युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात असल्याचे समजते. अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.