परभणी : परभणीत धनगर समाजाच्या तरूणांचा उद्रेक शुक्रवारी पाहायला मिळाला. संतप्त तरूणांनी भाजप खासदार विकास महात्मे यांच्या अंगावर पत्रकं फेकली. वसमत रोडवरील जागृती मंगल कार्यालयात ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरला होणा-या धनगर समाजाच्या निर्धार मेळाव्याच्या तयारीसाठी खासदार महात्मे परभणी दौऱ्यावर आलेत. त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात येत होता. त्यावेळी धनगर समाजाच्या संतप्त तरूणांनी काळे झेंडे दाखवून खासदार विकास महात्मेंचा निषेध केला. भाजप सरकारनं आरक्षण देण्याचं आश्वासन पाळलं नाही. सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केली, असा आरोप करत तरूणांनी कार्यक्रमात गोंधळ घातला.