Parbhani Election Results 2024 Live : परभणीत शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य ठरला आहे. परभणीत  शिवसेनेचे 35 वर्षाचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. परभणी लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर पराभूत झाले आहेत.  महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 1 लाख 30 हजाराच्या फरकाने विजयी झाले आहेत. मतमोजणीमध्ये शेवटपर्यंत महादेव जानकर पिछाडीवर राहिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली. तर, शेतकरी वर्गात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना वंचितने उमेदवारी दिली होती.


सुरुवातीला जानकरांना बारामतीतून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, बारामतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे जानकरांना महायुतीतून परभणीतून जागा देण्याची चर्चा झाली. मात्र जानकर घड्याळ की कमळ चिन्हावर लढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेरीस जानकर यांनी परभणीतून रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवली.