गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : सण उत्सव सोडून उन्हा –तान्हात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला (Parbhani Police) लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार परभणीत (Parbhani Crime) उघडकीस आला आहे. परभणीतल्या या प्रकारानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. स्पिकरवर गाणे वाजवण्यावरुन झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथे बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक संपल्यानंतर स्पिकरकडे जात असताना पोलीस हवालदार नारायण एकनाथ लटपटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हवालदार नारायण लटपटे गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. मारहाणीनंतर लटपटे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक संपल्यानंतर नारायण लटपटे हे स्पिकर बंद करण्यासाठी जात होते. त्याचवेळी गाणे वाजवण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद लटपटे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी हवालदार लटपटे यांना लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली. आरोपींनी लटपटे यांचे शर्ट फाडलं आणि काठीने डोक्यात मारहाण केली. या मारहाणीमध्ये लटपटे जखमी झाले. नारायण लटपटे यांच्या तक्रारीनंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अंतराम तिडके, बंटी तिडके, हरीभाऊ तिडके, सुरेश तिडके, आबा वाव्हळे आणि आणखी एकावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


मुलाकडून बापाची निर्घृण हत्या


दरम्यान, परभणीच्या मानवतमध्ये मुलानेचा बापाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. घर खर्चाला पैसे न देता दारुमध्ये पैसे उडवत असल्याने मुलाने बापाला संपवलं आहे. कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाने ही हत्या केली आहे. मोठ्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. परमेश्वर दत्तात्रय भोकरे (28) असे आरोपीचे नाव असून दत्तात्रय देविदास भोकरे (28) असे मृत पित्याचे नाव आहे. मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात दुपारी दत्तात्रय भोकरे यांचा मृतदेह सापडला होता. कुऱ्हाडीने दत्तात्रय भोकरे यांच्या मानेवर व खांद्यावर वार करुन ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. मोठया भावाच्या तक्रारीवरून लहान भाऊ परमेश्वर भोकरे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.