`फी`साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!
कल्याण येथील डीएसडी शाळेच्या विरोधात पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी देऊन आंदोलन केले. पालकांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
कल्याण : कल्याण येथील डीएसडी शाळेच्या विरोधात पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी देऊन आंदोलन केले. पालकांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
गुंडांची नेमणूक
फी वाढीबरोबरच पुस्तके आणि साहित्याची विक्रीही शाळेकडून मनमानीपणे चालू असल्याचा आरोप पालकांनी केलाय. शाळेने काही गुंड पालकांच्या मागे लावलेत, असा गंभीर आरोप करण्यात येतोय.
विद्यार्थ्यांना नाकारला प्रवेश
गेल्या आठवड्यात झी २४ तास ने कल्याण मधील या शाळेच्या मुजोरीचा प्रकार समोर आणला होता. ज्या पालकांनी फी भरण्यास नकार दिला त्यांच्या पाल्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे.
शिक्षणमंत्र्यांचे आदेश धुडकावले
शिक्षण मंत्री विनोद तावडे कल्याणात आले होते. तेव्हा झी २४ तासनं ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तावडे यांनी शाळेत येण्यापासून विद्यार्थ्यांना कोणी रोखू शकत नाही, असे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही शाळेची मुजोरी कायम आहे.