पार्थ पवारांना पंतप्रधान मोदींसारखी सुरक्षा द्या! रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar On Parth Pawar Security: पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar On Parth Pawar Security: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आलीय. पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. यासंदर्भात शासनाकडून आदेश पारित करण्यात आलाय.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय..पार्थ पवार हा अजित पवारांचा मोठा मुलगा असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता पार्थ पवार आई सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय आहेत. दरम्यान पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे सुरक्षा द्यावी अशी उपरोधिक टीका त्यांच्यावर केलीय. त्यांना वाय नव्हे झेड दर्जाची सुरक्षा द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
मावळ लोकसभेत माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी केला होता. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः बारणेंचा अर्ज करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित दादा करतायेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजित दादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यानं ते बारणेंचा प्रचार करतायेत. मात्र पार्थने चिंता करू नये, मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय अशी भूमिका रोहित पवार यांनी व्यक्त केलीय.
मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते पिंपरी चिंचवड मध्ये आले होते.