अंबरनाथ: शिवसेनेच्या नगरसेवकावर शिवसेनेच्याच शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनीच जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या हल्ल्यात नगरसेवक विकास पाटील जखमी झाले असून पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली आहे. विकास हे रविवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह अंबरनाथ एमआयडीसी भागातल्या जीआयपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना अचानक शिवसेनेचे शाखाप्रमुख जितू साळुंके आणि शिवसेनेचे कार्यकर्ते गणेश पाटील यांनी त्यांच्या ७ ते ८ साथीदारांसह येऊन विकास यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.


धारदार शस्त्राने वार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास पाटील हे उल्हासनगर महापालिकेत येणाऱ्या जुन्या अंबरनाथ गाव प्रभागाचे नगरसेवक आहेत. त्यांचे वडील परशुराम पाटील हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. विकास हे रविवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह अंबरनाथ एमआयडीसी भागातल्या जीआयपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना अचानक शिवसेनेचे शाखाप्रमुख जितू साळुंके आणि शिवसेनेचे कार्यकर्ते गणेश पाटील यांनी त्यांच्या ७ ते ८ साथीदारांसह येऊन विकास यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.


हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट


यावेळी बचावासाठी विकास यांनी गाडीत बसून तिथून पळून जात असताना त्यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेत विकास जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी गणेश पाटील याला अटक केलीये. हा सगळा प्रकार नेमका कशामुळे घडला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून पोलिसांनी अत्यंत किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप नगरसेवक विकास पाटील यांनी केलाय.