Mumbai Local Train Update: लोकलच्या लगेज कोचमध्ये एका प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात ड्युटीवर तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या दोघांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे पोलिस कॉन्स्टेबर विजय खांडेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान महेश अंडाले यांनी एका आजारी व्यक्तीला मेडिकल हेल्प देण्याऐवजी त्याला एकट्यालाच लोकल ट्रेनच्या लगेच कोचमध्ये त्याच्या सामानासह सोडून देण्यात आले. त्याच्या दुसऱ्यादिवशी गोरेगाव रेल्वे स्थानकात लगेच कोचमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?


मागील महिन्यात 15 फेब्रुवारी रोजी गोरेगाव रेल्वे स्थानकात लोकलच्या माल वाहतुकीच्या डब्यात एका प्रवाशाचा मृतदेह सापडला होता. या प्रवाशाची ओळख शेवरी येथे राहणारे अलाउद्दीन मुजाहिद (47) अशी पटली होती. या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर समोर आले की ते एका दुकानात सेल्समॅन म्हणून काम करतात. मुजाहिद यांना त्यांच्या कार्यस्थळी जायचे होते. त्यासाठी ते 14 फेब्रुवारी दुपारी रे रोड रेल्वे स्टेशनवर 2.22 वाजता उतरले होते. एका पोलिस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यात दिसून आले की, मुजाहिद यांना रेल्वे स्थानकातून उतरल्यावर थोडे अस्वस्थ वाटत होते. प्लॅटफॉर्म क्रमाक 2 च्या एका बेंचवर ते बसले होते. त्यानंतर साधारण 3.35 वाजता ते खाली कोसळले. 


मुजाहिद खाली कोसळल्यानंतर दोन वर्दीतील पोलिस कर्माचाऱ्यांनी मुजाहिद यांना पाहिलं. मात्र, त्यांना वाटले की ते नशेत आहे असं समजून त्यांनी लोकल ट्रेनच्या माल वाहतुक डब्यात त्यांना नेऊन बसवले. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेहच सापडला. 


कसा झाला खुलासा?


निष्काळजीपणामुळं एका रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्ट करण्यात आल्यानंतर त्यांचा ब्रेन हॅमरेजमुळं मृत्यू झाल्याचे समोर आले. रेल्वे पोलीस आयुक्त रवीद्र शिशवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून तक्रार दाखल करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रेय खुपरेकर यांनी म्हटलं की, गोरेगाव ते मुंबई सीएसएमटीपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जवळपास 100 फोटो आणि व्हिडिओ तपासल्यानंतर समोर आले की मयत रे रोड स्थानकातच कोसळला होता. ड्युटीवर तैनात असलेल्या दोन कॉन्स्टेबलच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुजाहिद यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि 19 वर्षांचा मुलगा आहे.