Shirdi accident News: शिर्डी येथे एक थराराक अपघात घडला आहे. बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. हा अपघात इतका डेंजर होता की, बसच्या काचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचा हा थरारा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डी शहरातील साईआश्रम भक्तनिवासाजवळ नगर मनमाड महामार्गावर हा अपघात झाला.  बस अपघाताची दृष्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. अतंत्य थरारक असा हा अपघात आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. खाजगी प्रवासी वाहतुक करणारी बस थेट रस्त्यावरील दुभीजकावर  आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या काचा फुटून तिन प्रवासी थेट रस्त्यावर कोसळले.  तर दोन प्रवासी  बसच्या दरवाजातून बाहेर पडले. या बसमधून 20 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र, चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. 


कारची दोन रिक्षांना धडक 


शिर्डीतील लोणी येथे कारने दोन रिक्षांना धडक दिली आहे. एका शिक्षकाची ही कार आहे.  सावळीविहीर फाट्याजवळ हा अपघात घडला. कारने दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेत दोन्ही रिक्षा चालका जखमी झाले आहेत. जखमी रिक्षा चालकांना साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. मागील सहा ते सात महिन्यांपासून  सावळीविहीर फाट्यानजीक उड्डाण पुलाचे  काम सुरू आहे. वळणाचा अंदाज चालकांना येत नसल्याने वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. साळवी फाट्याजवळ दिशादर्शक फलक नावे अशी मागणी नागरिक करत आहेत. 


सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी अलोट गर्दी


साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केली आहे. साईचरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत रांगा लावल्या आहेत. सलग सुट्टयांमुळे भाविकांसह पर्यटकांनीही गर्दी केली. यावेळी साईभक्तांनी साईनामाचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. रविवारची सुट्टी...15 ऑगस्ट आणि त्यानंतर 16 ऑगस्टला पारशी नववर्षानिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांमध्ये भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.