Ajit Pawar On Pawar Vs Pawar in Baramati : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काहीच महिन्यात सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात महत्त्वाची लढत म्हणजे बारामतीतील. लोकसभेनुसार विधानसभेलाही सर्वांचं लक्ष लागलंय ते बारामतीच्या लढाईकडे. लोकसभेत बारामतीच्या लढाईत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगली होती. मात्र विधानसभेला बारामती मतदारसंघातून स्वत: अजित पवार निवडणूक लढवतात, अशी चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा अजित पवारांविरोधात पवार कुटुंबातलाच उमेदवार उभा राहणार का? बारामतीत पुन्हा पवार वि. पवार होणार अशी लढाई रंगणार का असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना पडले आहेत. (Pawar Vs Pawar fight Baramati again in assembly elections supriya sule sunetra pawar What did Ajit Pawar say interview zee 24 taas)


काय म्हणाले अजित पवार ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवार यांनी अनेक विषयांवर आपले मत मांडले. मुख्यमंत्रिपदाबाबत दादांना खरंच काय वाटतं? मुख्यमंत्रिपदी संधी मिळणार का? यापासून विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार उभे राहणार आहेत का? असा अनेक प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं. 


बारातमीकडे महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येकाच लक्ष लागलेल असतं. अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर बारामतीतील गणित बदलेली आहेत. लोकसभेत नणंद विरुद्ध भावजयची लढत पाहिला मिळाली. आता विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांच्या विरोधात कोणाला शरद पवार उभं करणार असा प्रश्न विचारला जातोय. 



पण झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी अजित पवारांना विचारलं की, 'बारामतीत पुन्हा एकदा घरातलीच लढत पाहिला मिळणार आहे का?' त्यावर अजित पवार म्हणाले की, 'मी त्याच्यावर बोलायच नाहीच ठरवलंय. पण बाकीच्यांना काय बोलायच आहे, याची मुभा आहे ना...लोकशाही आहे.' त्यानंतर कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी विचारलं की, 'तुमच्या पुढे घरातूनच उमेदवार उभा करणार का?' या प्रश्नावर ते स्पष्ट म्हणाले की, 'मी त्याच्याबद्दल काय बोलू शकतो. मी काहीच बोलू शकत नाही. त्यासोबत बारामतीतून कोण लढणार याबद्दल पक्ष ठरवेल' असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.