पेंच व्याघ्रप्रकल्पात १ ऑक्टोबरपासून सफारी, असं करता येणार बुकिंग
पेंच व बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड क-हांडला अभायरण्यात १ ऑक्टोबरपासून सफारी सुरु होणार आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पेंच व बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड क-हांडला अभायरण्यात १ ऑक्टोबरपासून सफारी सुरु होणार आहे. पावसाळ्यानंतर जंगलातील रस्त्यांची परिस्थिती व्यवस्थित असल्यास येथे सफारी सुरु होणार आहे. सुरुवालीला ऑफलाईन सफारीचे बुकींग होणार आहे.
लॉकडाऊननंतर आता वन पर्यटकांनकरता खूशखबर आहे. पेंच व बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड क-हांडला अभायरण्यात ऑफलाईन पद्धतीनं १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान या प्रकल्पाच्या प्रवेशाद्वारांवर सफारीचे बुकींग करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या क्षमतेच्या ५० टक्केच पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे.
खुल्या जिप्सीत १ वाहनचालक, १ गाइड आणि ४ पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. तर खासगी गाड्यांच्या बाबतीत ५० टक्के पर्यटक संख्या ही गाडीनुसार निश्चित करण्यात येईल. याशिवाय सफारी दरम्यान कोविडबाबतच्या सर्व नियमांचे आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांची अगोदर थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशाच्या किमान अर्धा तास आधी पर्यटकांनी प्रवेशद्वारासमोर उपस्थित राहणे अपेक्षित असणार आहे.