`शिवसेनेला लोक हसतायत`
महागाईविरोधातलं शिवसेनेचं आंदोलन आणि अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी दिलेली भेट यावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.
कोल्हापूर : महागाईविरोधातलं शिवसेनेचं आंदोलन आणि अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी दिलेली भेट यावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेना मंत्रिमंडळात आहे. मुख्यमंत्री त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांनी तिकडे मतं मांडावीत. रस्त्यावर जाऊन आंदोलन करणं बरोबर नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
अशामुळे शिवसेनेला आपण लोकप्रिय होत आहोत, असं वाटत असेल तर त्यांनी सर्व्हे करावा. लोक त्यांच्यावर हसत आहेत. एवढंच असेल तर सत्तेतून बाहेर पडा आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करा, असं लोकं म्हणतायत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.