कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये राडा (व्हिडिओ)
लोकलचा प्रवास हा काही मुंबईकरांना नवा नाही. त्यामध्ये होणारे वाद आणि किस्से हे देखील काही नवे नाही. असं सगळं असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मुंबई : लोकलचा प्रवास हा काही मुंबईकरांना नवा नाही. त्यामध्ये होणारे वाद आणि किस्से हे देखील काही नवे नाही. असं सगळं असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ आहे कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा. लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून एका युवकाला लोकलमध्ये नियमित प्रवास करणाऱ्या एका गटाने दादागिरी करत मारहाण केली. शिवाय त्या प्रवाशाला लोकल बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने गुरूवारी सकळी आठ वाजून सात मिनिटांची लोकल निघाली. या लोकलमध्ये एक प्रवासी चढला. त्याला अन्य प्रवाशांनी बसू दिले नाही. बसण्याच्या जागेवरून टोळक्याने त्याचा चक्क गळा पकडून त्याला डब्याच्या बाहेर हुसकावून लावले. त्या प्रवाशाला अतिशय घाणेरड्या शिव्या दिल्या आणि मारहाण देखील केली.
प्रवास करताना अशा प्रकारची दादागिरी सहप्रवाशांसोबत करणे हे किती योग्य आहे याचा विचार करावा. अशापद्धतीने कुणाचा गळा दाबून कायदा हातात घेणं हे योग्य नाही. आपण या अगोदर देखील पाहिलं आहे की प्रवासात झालेल्या वादाचा परिणाम अतिशय भयंकर झाला आहे.
व्हिडिओ : सोशल मीडिया न्यूज