शिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल
शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय.
गोंदिया : शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय.
तसेच सरकारचा सध्याचा कामकाजावर वेळोवेळी टीका टिप्पणी करणारे भाजपचे खासदार यांचावर देखील टोला मारीत त्यांनी नाना पटोले यांनी केवळ रडत बसू नये तर जनतेचे प्रश्न हे सभागृहात मांडावे ,अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी नाना पटोले यांचावर टोला मारीत दिली.
दरम्यान, सत्तेतून बाहेर पडण्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. ग्रामीण भागातील आमदारांचा सत्तेतून बाहेर न पडण्यासाठी शिवसेना श्रेष्ठींवर दबाव वाढत आहे.आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये, ग्रामीण भागातील आमदारांचा दबाव वाढत आहे. सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेवरून ग्रामीण भागातील आमदारांनी मातोश्रीवर निरोप पोहोचवलाय.
मुंबईतील काही आमदार आणि पदाधिकारी यांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा आग्रह धरला आहे. मंत्रीमंडळ फेरबदलात शिवसेनेच्या जुन्या मंत्र्यांना वगळून नवीन लोकांना संधी देण्याची ग्रामीण भागातील आमदारांची मागणी आहे. सत्तेत राहून दोन वर्षांत ग्रामीण भागात शिवसेना वाढविण्यावर भर देण्याची ग्रामीण भागातील आमदारांची भूमिका आहे, अशी माहिती शिवसेनेनेतील सूत्रांनी दिलेय.