COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रणव पोळेकर, झी मीडिया, चिपळूण रत्नागिरी : राज्यातील समाज आजही अस्पृश्यता आणि जातीभेदांच्या विळख्यात अडकलाय. चिपळूण तालुक्‍यातील कळकवणे गावात अशी घटना घडलीय. 


हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावात घडलेली  दुर्दैवी घटना... रोहिदास समाजातील तानू लक्ष्मण मेढेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झालं... शासकीय स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी समाज बांधवांनी गाव प्रमुखांना विचारलं. मात्र, त्यांनी असहमती दाखवून स्मशानभूमित अंत्यविधीला विरोध केला. विरोधानंतर अंत्यविधी नदी किनारी करण्याचा निर्णय झाला. मात्र, नदीला पूर आल्याने अर्धवट जळलेली लाकडं आणि अस्थी पाण्यात वाहून गेल्या.


रोहिदास समाजाचं एकच घर असल्याने गावातील पालखीदेखील त्यांच्या घरी दिली जात नाही. पाणी पुरवठादेखील केला जात नाही, असा आरोप मेढेकर कुटुंबियांनी केलाय. ही घटना घडल्यानंतर मेढेकर कुटुंबियांनी याविरोधात गुन्हा दाखल केलाय.


मात्र घडलेली घटना निंदनीय असल्याचं गावकऱ्यांना वाटतंय आणि त्यांनी त्यासाठी गावातील हा तेढ सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्यांचं सांगितलंय. 


अस्पृश्यता हा समाजाला जडलेला मानसिका आजार आहे खरं त्यावरच काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे, तरच कळकवणेसारख्या घटना आपण टाळू शकतो...