Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांनी जीवे मारण्याची धमकी (threatened) देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर मोठी गोंधळ उडाला अशातच आता एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याच्या कटाची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या इसमास लोणावळा पोलिसांनी केली अटक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय वाघमारे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मूळचा आटपाडीचा रहिवासी असलेला वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. हॉटेल मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिली. हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी वाघमारे याने केला होता. पोलिसांना खोटा कॉल केल्याची माहिती आहे.


पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलेल्या धमकीनंतर गुप्तचर विभागाने तपास सुरु केला होता, त्यानंतर आता अजय वाघमारे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


सर्वात मोठी बातमी : "आत्मघातकी स्फोटानं एकनाथ शिंदे यांना उडवणार"


दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्याकडून धमकी देण्यात आली होती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी वेळीच आरोपीच्य़ा मुसक्या आवळल्या आहेत.