इंदापूर : तालुक्यात सध्या पेट्रोलियम पदार्थाचे साठे शोधण्याच्या चाचण्या सुरु आहेत. देशातील गाळयुक्त खोऱ्यांमध्ये हॅड्रोकार्बनचे साठे पाण्याची शक्यता तपासण्यासाठी २-डी सेस्मिक डेटा संकललनाच्या कामानं वेग घेतला आहे.


खोऱ्यात हायड्रोकार्बनचे साठे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी इंदापूर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. इंदापुरात सध्या आहोरात्र बोरींगच्या मशीन्सचा खडखडाट ऐकू येतोय. देशात गाळयुक्त खोऱ्यात हायड्रोकार्बनचे साठे असण्याची शक्यता तपासण्यासाठी टू डी सेस्मिक डेटा संकलित करण्याचं काम इंदापुरात जोरात सुरु आहे.


भूगर्भात पेट्रोल, डिझेल, गॅसचे साठे


प्रत्यक्षात भूगर्भात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे साठे शोधण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने सॅटेलाईटद्वारे अक्षांश व रेखांशांच्या मदतीने राज्याचं सर्व्हेक्षण केलंय आणि त्यानुसार द्रव्यखनिज साठे शोधन्यास सुरुवात केली आहे.  जीपीएसच्या मशीनने ही स्थाने मार्क करण्यात आलीत.


या ठिकाणी साडेचार इंचाचे बोअरवेल घेऊन त्यात पाणी भरून एक छोटासा ब्लास्ट केले जातो. यातून निर्माण होणा-या लहरी एका मशीनमध्ये संकलित करून याचा अहवाल भारत सरकारकडे पाठवला जाणार आहे. 


 द्रव्य खनिजाच्या उपलब्धतेबाबत कुतूहल


या ठिकाणी किती प्रमाणात गॅस किंवा पेट्रोलियम पदार्थ आहेत हे समजणार आहे. याची चाचणी घेण्याचे काम इंदापूर तालुक्यात सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी बोअरवेल घेणार-या दहा मशीन तसेच ट्रॅक्टरचा ताफा कार्यरत आहे.  यामुळे निरा भिमा पट्ट्यातील नागरिकांमध्ये द्रव्य खनिजाच्या उपलब्धतेबाबत कुतूहल निर्माण झालंय.