मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रातही दरात भरमसाठ वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक शहरात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पेट्रोलियम इंधनाची मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या बाजारात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. या आठवड्याच्या शेवटी इंधनाचा दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. घरगुती बाजारात तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. (Petrol, diesel prices today: Fuel prices hiked again; Petrol climbs to Rs 109.21 per litre in Parbhani Maharashtra ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचा दर 


शहर

पेट्रोल

डिझेल

नागपूर

106.69
 

95.71


 

अहमदनगर

106.54

95.60
 

अकोला
 

106.78

95.86

रायगड / अलिबाग

107.04

96.05 

परभणी

109.रुपये 21पैसे
 

98.रुपये 19 पैसे


 

अमरावती


 

108.38

-98.94


 



एकीकडे लोकल सेवा बंद आहे तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. यामुळे सामान्य मुंबईकरांचं जगण कठीण होऊन बसले आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत.यामुळे किमान आता तरी मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. मुंबईत आज पेट्रोलचा भाव 106.93 पैसे तर डिझेलचा भाव 97.46 पैसे आहे. 


भारतातील पेट्रोल-डिझेलचा दर 


दिल्ली – पेट्रोल १००.९१ रुपये आणि डिझेल ८९.९८ रुपये प्रतिलिटर
मुंबई – पेट्रोल १०६.९२ रुपये आणि डिझेल ९७.४६ रुपये प्रतिलिटर
चेन्नई – पेट्रोल १०१.६७ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
कोलकाता – पेट्रोल १०१.०१ रुपये आणि डिझेल ९२.९७ रुपये प्रतिलिटर
बंगळुरू – पेट्रोल १०४.२९ रुपये आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रतिलिटर
लखनऊ – पेट्रोल ९८.०१ रुपये आणि डिझेल ९०.२७ रुपये प्रतिलिटर
पटना – पेट्रोल १०३.१८ रुपये आणि डिझेल ९५.४६ रुपये प्रतिलिटर
भोपाळ – पेट्रोल १०९.२४ रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रतिलिटर