पुणे : पारदर्शी कारभाराचा दावा करणारे मुख्यमंत्री तसंच मंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून खाली उतरावं आणि रस्त्यावरचे खड्डे बघावेत म्हणजे त्यांना परिस्थितीची जाणिव होईल असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. राज्यातील खड्डयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुप्रिया यांनी आज पुण्यातील बोपदेव घाटात खड्डयासोबत सेल्फी काढला. खडड्यांबाबत सरकारनं आजवर काय केलं यावर एक श्वेतपत्रिका काढण्याची मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वर्षापूर्वी #SelfieWithPotholes ही मोहिम सुरु करताना बोपदेव घाट येथे मी सेल्फी काढून रस्त्याची दूरवस्था दाखवून दिली होती. आज एक वर्षानंतरदेखील या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी रोज नवी डेडलाईन मिळते पण काम काही होत नाही. स्ते राज्याच्या विकासाच्या जीवनवाहिन्या असतात. त्या खड्ड्यांमुळे कोंडल्या गेल्या आहेत. याचा जनतेला त्रास सहन करावा लागतोय. शिवाय खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण मिळतेय. @CMOMaharashtra खड्डे बुजवून रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी गेला कुठे? राज्यातील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही! वाढते अपघात त्यामुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? पारदर्शक कारभाराचे दावे करणाऱ्या या सरकारला रस्त्यांची दूरवस्था दाखवुया' असं सुप्रीया सुळे यांनी ट्विटरवर म्हटलंय.