पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिलीय. औद्योगिक कायद्यानुसार महासंघ आणि महापालिकेत गेल्या वर्षी 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत पाच वर्षांचा करार झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथा बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास मुख्य लेखाधिका-यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे कर्मचारी महासंघ आक्रमक झाला होता. त्यांची याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर आयुक्तांनी प्रथा बोनस आणि अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.