पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात आज एक धक्कादायक घटना घडली... जमिनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागल्यानं इथं एकच खळबळ उडाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. 


भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचं सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून उकळते गरम पाणी येऊ लागलं. 


पाणी एवढं गरम होतं की प्लास्टिकची बाटली अवघी दहा सेकंद वितळत होती. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. 


मात्र अखेर चमत्कार वगैरे काही नाही... शॉर्ट-सर्कीटमुळे पाणी गरम होत असल्याचं उघड झालं.