पुणे : पिंपरी चिंचवड शहरातल्या बाळ चोरी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. बाळाची आई रेश्मा शेख हिनेच १० दिवसांच्या बाळाच्या चोरीचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसरीही मुलगीच झाली म्हणून दापोडीमध्ये राहणा-या रेश्मा शेख हिनं हा बनाव रचल्याचं उघड झालं आहे. रेश्मा शेख काल सकाळी दहाच्या सुमाराला खडकीमधल्या शेवाळे रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. 


तिथून घरी परतण्यासाठी तिनं रिक्षा केली. हॅरीस ब्रिजजवळ रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली. त्यावेळी रिक्षात बसलेल्या दुस-या महिलेने आपल्याला रिक्षातून ढकलून दिेलं आणि रिक्षासह पळ काढला असा कांगावा, काल रेश्मा शेखनं केला होता. 


दरम्यान शेवाळे रुग्णालय आणि घटनास्थळ या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यानं पोलीस तपासात अडचण आली होती. मात्र खडकी पोलिसांनी तपास करुन अखेर सत्य बाहेर काढलं. तिने बाळाला नदीत फेकल्याचं कबुल केलंय. आता बाळाच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.