पिंपरी : राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी परिसरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. (व्हिडिओ पाहण्यासाठी काली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री घरात एकटी असल्याचा फायदा घेत एका अनोळखी व्यक्तीनं या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ या महिलेनं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली.


यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


या संपुर्ण प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.



पिंपरीतील धक्कादायक घटना