कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड - शिक्षणाला वय नसतं असं म्हणतात...! माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि पुढे जात असतो. पिंपरी चिंचवड मधल्या नीलिमा फाटक यांनी हे शक्यही करून दाखवलंय. वयाच्या 56 व्या वर्षी नीलिमा फाटक यांनी पुणे विद्यापीठातून मराठी विषयात एम ए पदवी तर मिळवलीच पण या कामगिरीसाठी त्यांनी चार सुवर्ण पदकही कमावलीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी भाषेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 'एम एन अदवंत स्मृती सुवर्णपदक', 'स्वर्गीय बळवंत टिळक स्मृती सुवर्ण पदक', 'स्वर्गीय प्रतिमा दत्तात्रय अलगावकर स्मृती पदक' आणि 'द चांसेलर्स सुवर्ण पदक' देण्यात आलं आहे. येत्या 28 जून किंवा 7 जुलैला त्यांचा पदवीदान समारंभ होणार आहे. वयाच्या 56व्या वर्षी नीलिमा फाटक यांचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.


फाटक यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली, त्या नंतर त्या वकीलही झाल्या. शिक्षणानंतर बँकेत नोकरीला लागलेल्या नीलिमा फाटक यांनी 54 व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली. या संपूर्ण काळात त्यांनी लेखन, वाचन हे छंद जोपासले. त्यांचा 'नील माधव' हा कविता संग्रह 2019 ला प्रकाशित झाला. विशेष म्हणजे त्यांची एक कविता मॉरीशिअसमधल्या नववीच्या अभ्यासक्रमात आहे.