पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडमधल्या वेदांत भोसले या दहावीतल्या विद्यार्थ्याची हत्या एकतर्फी प्रेमातून झाली हे जरी खरं असलं, तरी शहरीकरणाच्या रेट्यात असंवेदनशील समाजाचा तर तो बळी नाही ना, अशी चर्चा आता होऊ लागलीय.


मित्र त्याच्यावर वार करत होता आणि जीवाच्या आकांताने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकतर्फी प्रेमात सद्सदविवेक बुद्धी विसरलेला, त्याचाच मित्र त्याच्यावर वार करत होता आणि जीवाच्या आकांताने तो मदतीसाठी धावत होता...हा प्रसंग कुठल्या चित्रपटातला नाही तर पिंपरीमध्ये दोन दिवसांपूर्वी वेदांत भोसले या दहावीतल्या विद्यार्थ्याबाबत घडलेला हा प्रकार आहे. ज्या दिवशी वेदांतची हत्या झाली त्या दिवशी आरोपी रोहीत मागीकर या आरोपीने त्याला लिफ्ट मागितली. 


गाडीवर बसून त्याने वेदांतला निर्जन रस्त्यावर नेले


गाडीवर बसून त्याने वेदांतला निर्जन रस्त्यावर नेले आणि त्याच्यावर सपासप वार सुरू केले...रक्ताची धार वाहत असताना वेदांत जीवाच्या आकांताने धावत होता, धावत धावत तो मोरया क्लासिक वसाहतीत शिरला. तिथे जीवाच्या आकांताने मदतीसाठी तो ओरडत होता.


तेवढ्याच वेदनेने वेदांतचे आई वडील सांगतायत...


ही मदत मागत असताना त्याची अवस्था काय होती, हे जिन्यावर सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट कळू शकते. त्याच अवस्थेत तो मदत मागत होता. वेदांतला मदतही मिळाली खरी...पण तीच मदत लवकर झाली असती तर त्याचे प्राण वाचले असते, हे तेवढ्याच वेदनेने वेदांतचे आई वडील सांगतायत.


दुसरीकडे ज्या मोरया क्लासिक वसाहतीत वेदांत मदतीसाठी गेला तिथे एका महिलेने त्याला मदत केली. 


फ्लॅट संस्कृतीमध्ये प्रत्येकजण आपल्या पुरत जगायला लागलाय. त्याची वाढती असंवेदना आशा घटनांमध्ये एखाद्याचा जीव घेऊ शकते...वेदांत त्याचाच बळी ठरलाय. म्हणून बंद कोशातून बाहेर पडण्याची गरज आहे.