पेण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाज हिताची कामे राज्यभरात होत असतात. त्याचाच एक भाग म्हणून पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने उजाड डोंगराचे वनराईत रुपांतर झालेले पाहायला मिळत आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची गरज ओळखून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांच्या श्री सदस्यांना वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने पेण तालुक्यात श्री सदस्यांनी वृक्ष संवर्धन मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत सात एकर जागेवर ४९४८ झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उंबर्डे येथील उजाड डोंगरी वनराईने बहरलेली पाहायला मिळत आहे. 


असे होत आहे वृक्ष संवर्धन 


वृक्ष संवर्धन मोहिमेद्वारे सात एकर जागेत सुमारे पाच हजार विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड श्रीसदस्यांनी केली.
 प्रत्येक आठवड्यात वृक्षसंवर्धनाचे काम सातत्याने करण्यात येत आहे. तालुक्यातील ७४८ सदस्यांनी भाग घेत झाडांभोवती वाढलेले गवत काढणे, झाडांना मातीची भर घालणे, सात एकर जागे भोवती चर खोदणे, अंतर्गत साफसफाई करणे अशी कामे करण्यात आली.
 पाच वर्षापूर्वी लागवड केलेल्या या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील श्री सदस्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.