Vande Bharat Train : आता अहमदाबाद- मुंबई मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन, पाहा वेळापत्रक
Mumbai Vande Bharat Train : मुंबई ते अहमदाबादला जोडणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार असून या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Mumbai Vande Bharat Train News in Marathi : देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढत चालली आहे. अमृत भारत ट्रेनही प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी लवकरच सुरू होणार आहे. भारतीय रेल्वेच्या मिशन रफ्तारचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस 160 किमीच्या वेगाने धावू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ सुमारे 50 मिनिटांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम रेल्वे मिशन रफ्तार प्रकल्पाचे काम चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. मिशन रफ्तार अंतर्गत मुंबई-सुरत-वडोदरा-दिल्ली आणि मुंबई-वडोदरा-अहमदाबाद या महत्त्वाच्या विभागांमध्ये रेल्वे ताशी 160 किमी वेगाने धावतील. याचदरम्यान आजपासून (12 मार्च) पश्चिम रेल्वेवरील मुंबई ते अहमदाबादला जोडणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन धावणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरील प्रवासाचा वेळ 30 ते 50 मिनिटांनी कमी होईल. महाराष्ट्रात एकूण सात वंदे भारत एक्सप्रेस धावतात. ही संख्या येताच आठ होणार असून सध्या वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर, सीएमटी ते मडगाव, सीएमटी ते शिर्डी, सीएमटी ते सोलापूर, बिलासपूर ते नागपूर आणि नागपूर ते भोपाळ या मार्गावर धावतत आहे. आता आठवी वंदे भारत ट्रेन आजपासून मुंबई- अहमदाबा या मार्गावर धावणार आहे.
असं असेल अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वेळापत्रक
22962 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस 13 मार्चपासून रविवार वगळता दररोज सकाळी 6.10 वाजता अहमदाबादहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. तर 22961 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबई सेंट्रल येथून रविवार वगळता दररोज दुपारी 3.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.25 वाजता अहमदाबादला पोहोचेल. अहमदाबाद-जामनगर वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ओखा स्थानकापर्यंत वाढवण्यात येत आहे. 13 मार्चपासून, 22925 अहमदाबाद-ओखा वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस अहमदाबादहून मंगळवार वगळता दररोज संध्याकाळी 6.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 12.40 वाजता ओखा येथे पोहोचेल.
वंदे भारत कोणत्या दहा मार्गांवर धावणार?
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद, विशाखापट्टणम-सिकंदराबाद, म्हैसूर-चेन्नई, पाटणा-लखनौ, न्यू-जलपाईगुडी-पटना, पुरी-विशाखापट्टणम, लखनौ-डेहराडून, कलबुर्गी-बेंगलोर, रांची-वाराणसी, खजुराहो- दिल्ली किंवा दाहा मार्ग.वंदे भारत ट्रेन आज सुरू होणार आहे.
या गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखला असून अहमदाबाद-जामनगर वंदे भारत द्वारकापर्यंत विस्तारित केली जाणार आहे. अजमेर-दिल्ली सराई रोहिल्ला वंदे भारत चंदिगडपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. तसेच गोरखपूर-लखनौ वंदे भारतचा विस्तार प्रयागराजपर्यंत केला जाईल आणि तिरुवनंतपुरम-कासारगोड वंदे भारत मंगळुरूपर्यंत वाढवला जाईल.