बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे मोदींच्या हस्ते प्रकाशन
बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे.
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी या आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आणि गोरगरीबांच्या विकासासाठी आणि शिक्षणाबद्दलचे योगदान असो किंवा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील यशासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो, त्यांचे कार्य पिढ्यांना प्रेरणा देईल, असे उद्घार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.
मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातील मराठीतून महाराष्ट्राचा गौरव करत वंदन केले. मी आधीच वेळ दिला होता. मात्र, कोरोनामुळे येथे येऊ शकलो नाही. मात्र, कोरोणामुळे आज व्हर्चुअल पध्दतीने पुस्तकाचे प्रकाशन करतोय, असे म्हटले. मी त्यांचे काम पाहिले आहे. समाज्यासाठी राजकारण आणि सत्ता हे पथ्य मी नेहमी पाळले. समाज्याच्या भल्यासाठी त्यांनी काम केले आहे. देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांची चिंता त्यांनी व्यक्त केली. अनेक योजना राबविल्या. शेतीत नविन आणि जुन्या पध्दतीचा ताळमेळ ठेवण गरजेचे आहे. साखर कारखान्यातून आता इथेनॉलही उत्पादन होत आहे. इथेनॉलचा वापर वाढला की बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात येईल, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
विखेंना पाणी परीषदेच्या माध्यमातून जण आंदोलन छेडले होते. देवंद्र सरकाची पाण्यावर काम ही मोठी उपलब्धी आहे. ९० योजनांवर काम सध्या काम चालू आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी विखेंबद्ल आपले विचार व्यक्त केले. प्रवरानगर येथे मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुभाष भामरे, हरीभाऊ बागडे, हर्षवर्धन पाटील, सुनंदा पवार, प्राजक्त तनपुरे, पोपटराव पवार, सुरेश धस, वैभव पिचड,बबनराव पाचपुते, खासदार सुजय विखे, खासदार प्रितम मुंडे, धैर्यशील माने हे उपस्थित होते.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांचे 'देह वेचावा कारणी' हे आत्मचरित्र आज प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती होती.
दरम्यान, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असे करण्यात आले आहे. १९६४ साली नगरच्या लोणी इथं प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना सुरु केला होता.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्यासाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झाले.ते मूळचे काँग्रेस पक्षाचे परंतु ते काही काळ शिवसेनेत होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे-पाटील यांनी देशभरातील ४५ खासदारांना एकत्र करून काँग्रेस फोरम फॉर ॲक्शन स्थापन करून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले होते.