सोलापूर : दक्षिण सोलापुरातल्या कुंभारी गावातील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी संगणमत करून किडनी खराब नसतानाही ती निकामी असल्याची बतावणी करून किडनी काढल्याच्या महिलेच्या आरोपामुळे हें मेडिकल कॉलेज चर्चेत आलं आहे. पोटदुखीसाठी  उपचार घेताना किडनी काढून घेतल्याचा आरोप कवठे गावातील सुनिता इमडे यांनी केला होता. अनेक ठिकाणी तक्रारी केल्या पण काहीही उपयोग न झाल्याने महिलेने सनराइज हेल्थ अँड रिसर्च फाउंडेशन बार्शी याकडे तक्रार केली. या संस्थेने याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाला केल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव आला चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील रुग्णसेवेवर संशयाचे धुके दाटले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यात कवठे गावात राहणाऱ्या सुनिता इमडे ही जुलै 2016 ला आईच्या मोतीबिंदू ऑपरेशनसाठी कुंभारी येथील अश्विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे गेली होती, त्याच दरम्यान तिच्या पोटात दुखत असल्याने तिने यास हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. डॉक्टरांनी सुनिताच्या सूज आली असे सांगून यासाठी ऑपरेशनचा सल्ला दिला. हे ऑपरेशन राजीव गांधी आरोग्यदायी जीवन योजने मधून करण्याची हमीही दिली त्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन तिला अॅडमिट करून घेतले याच दरम्यान तिच्याकडून हॉस्पिटलने आठ हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून जमा करून घेतले. तिच्या रक्ताच्या इतर चाचण्या करून घेतल्या आणि सुनिताच्या आईला, भावाला सुनीताची उजव्या बाजूची किडनी ही पूर्ण निकामी झाल्याचे सांगून तात्काळ काढणे काढावी लागेल नाहीतर अनर्थ होईल अशी भीती दाखवली. सुनिताची आई आणि भाऊ हे दोघेही अशिक्षित असल्याने त्यांची सह्या अंगठ्या घेऊन आपली किडनी काढून घेतल्याचा आरोप पीडित महिला सुनिता इमडे हिने केला आहे.


सुनीताला जास्त त्रास नसतानाही किडनी काढण्याची सून त्याची विनवणी धुडकावून आणि तिची संमती नसतानाही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी किडनी काढून तिला शारीरिक अपंग बनल्याचा आरोप सुनिता इमडे या पीडित महिलेने केला आहे. ऑपरेशन गांधी आरोग्यदायी जीवन योजने मधून करण्याचे आश्वासन देऊनही सुनिता इमडे हिच्याकडून 45 हजार रुपये घेतल्याची तक्रार ही सुनिता ना केली आहे, याबाबत तिने अनेक डॉक्टर कडे चौकशी केली आणि तपासणी केली असता किडनी काढण्याची आवश्यकता नसल्याचे इतर सर्व डॉक्टरांनी सांगितले. त्यावरून ती पूर्ण खचून गेली, अखेर तिने बार्शी येथील सनराइज् हेल्थ अँड रिसर्च फाउंडेशन कडे आपल्या तक्रारी अर्ज दिला.


सनराइज् हेल्थ अँड रिसर्च फाउंडेशन या संस्थेचे डॉक्टर महेश नायकुडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती अश्विनी हॉस्पिटल करून घेण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी प्रकरणात नक्कीच गोंधळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालय नई दिल्ली येथे तक्रार दिली, डॉक्टर महेश नायकुडे यांनी पीडित महिला सुनिता इमडे हिच्या उपचाराची रिपोर्ट पाहून सुनीताची गरज नसताना काढलेली किडनी गेली कुठे असा सवाल करून या हॉस्पिटलमध्ये किडनीचे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली आहे


डॉक्टर महेश इमडे यांनी पंतप्रधान कार्यालयाला तक्रार केल्याचे कळताच अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज हॉटेल अँड रिसर्च सेंटरच्या डॉक्टर घुले यांनी सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात महेश इमडे यांच्याविरोधात कलम 419 अंतर्गत गुन्हा दाखल केला, आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न  अश्विनी हॉस्पिटल ने केल्याचा आरोप डॉक्टर महेश यांनी केलाय याबाबतची रीतसर तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


संपूर्ण घटनेतबाबत आमची झी24तास ची टीम कुंभारी येथील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सोमवारी गेले असता हॉस्पिटलला सुट्टी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. या एकूण प्रकरणाबाबत आम्ही हॉस्पिटलची प्रतिक्रिया घेण्यासाठी सतत हॉस्पिटलच्या संपर्कात आहोत जशी प्रतिक्रिया येईल तसे आम्ही मांडणार आहोत.