पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचेवडमधल्या चिंचवड गावात पीएमपीएलची बस आगीत जळून खाक झालीय. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास चिंचवडगाव इथं घडली. 


चिंचवडगावात पीएमपीचे बस स्थानक आहे. एमएच १२ एचबी ४०१ या क्रमाकांची पीएमपीची बस चिंचवड स्थानकात आली होती. स्थानकाबाहेर बस उभी होती. त्यावेळी पावणे दोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. 


ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे.