नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : 'कर्ज काढून सण साजरा करू नका' अशी भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस घेऊ नका, असं आवाहन करणाऱ्या तुकाराम मुंढेंना अखेर महापालिकेनं खोटं पाडलं. संचालक मंडळाने पीएमपीएल कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमपीएल संचालक मंडळाने बोनस न देण्याच्या तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला बाजूला सारत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. बोनसमुळे 32 कोटींचा बोजा महापालिकेवर पडणार होता. कर्ज काढून सण साजरा करायला तुकाराम मुंढेंचा विरोध होता. कामगारांनीही गुरूवारी बोनससाठी आंदोलन केलं.


मुंढेंनी स्वत:चा बोनस नाकारला


बोनससाठी लागणारे 32 कोटी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिका देणार आहेत. कामगारांना किमान 26 हजार ते जास्तीत जास्त 1 लाख 3 हजार रूपये बोनस मिळणार आहे. 


तुकाराम मुंढेंनी स्वतःला मिळणारा बोनस नाकारलाय. तसंच पुढल्या वर्षी बोनस मिळणार नाही, असंही जाहीर करून टाकलंय. 


बोनस मिळाल्यावर आता कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल. बोनससाठी भांडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता त्याच उत्साहाने पीएमपीएल तोट्यातून बाहेर काढण्यासाठीही झटून कामाला लागावं हीच अपेक्षा...